Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांची आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

By admin | Updated: November 19, 2014 23:21 IST

ऊसदराबाबत चर्चा होण्याची शक्यता

कोल्हापूर : राज्यातील खासदारांची उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. राज्याचे केंद्रस्तरावर विविध प्रश्न प्रलंबित आहेत, याबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. ऊसदराचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्याने याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली जाते; पण यावर्षी विधानसभा निवडणुका असल्याने हिवाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक होत आहे. राज्याच्या दृष्टीने जे केंद्र सरकारच्या पातळीवर प्रश्न प्रलंबित आहेत, इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. राज्यात सध्या ऊसदरावरून कोंडी निर्माण झाली आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ऊसदराबाबत मंगळवारी राजगोपाल देवरा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर उद्याच्या खासदारांच्या बैठकीतही चर्चा केली जाणार आहे. - खासदार राजू शेट्टी