मुंबई : प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या राहुल राज सिंगच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. रविवारीही राहुलने बांगुरनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. राहुलविरोधात गुन्हा दाखल केल्यापासून तो कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली . कोर्टाने १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे अंतरिम आदेश दिले असल्याने राहुलला अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)
राहुलच्या जामिनावर आज सुनावणी
By admin | Updated: April 18, 2016 02:06 IST