Join us

पनवेलमध्ये आज दिग्गजांच्या सभा

By admin | Updated: May 21, 2017 02:04 IST

महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडणार आहे. पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागात ७८ जागेसाठी लढत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहेत. भाजप, शेकाप

- वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडणार आहे. पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागात ७८ जागेसाठी लढत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहेत. भाजप, शेकाप अशी मुख्य लढत असताना शिवसेनेनेही पहिल्यांदाच येथे आपली ताकद दाखवून दिली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या दिगज्जांच्या सभा होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पनवेल व खारघर अशा दोन सभा होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची कामोठेत अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे आदींच्या सभा होणार आहेत दरम्यान भाजपच्या वतीने मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री पनवेल आले होते. यामध्ये रणजीत पाटील, राम शिंदे, गिरीश बापट, रवींद्र चव्हाण, यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पनवेल मध्ये हजेरी लावली आहे. सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व संपर्क प्रमुख आदेश बांदेकर तळ ठोकून आहेत .