मुंबई : दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरू या सहा मेट्रोमध्ये एटीएममधून महिन्याला पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढणो किंवा जमा रकमेची चौकशी केल्यास शनिवारपासून 2क् रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
रिझव्र्ह बँकेच्या नव्या नियमानुसार शुल्क निर्धारित करण्यात आले. महिन्यातून पाचपेक्षा जास्त वेळा बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढणो, मिनी स्टेटमेंट किंवा अन्य व्यवहार केले जात असल्यास त्या खातेदाराला त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी प्रत्येकी 2क् रुपये शुल्क द्यावे लागेल. खाते नसलेल्या अन्य बँकांतून यापूर्वी महिन्यातून पाच वेळा नि:शुल्क पैसे काढण्याची मुभा असायची ती सोय आता केवळ तीन व्यवहारापुरती सीमित असेल. एटीएमची वाढती संख्या, बँक शाखा आणि पैसे काढण्याचे अन्य पर्याय उपलब्ध असल्यामुळे दुस:या बँकेच्या एटीएमचा नि:शुल्क वापर 5 ऐवजी 3 वेळा करण्याची मुभा असेल, असे रिझव्र्ह बँकेने ऑगस्टमध्ये जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मार्च 2क्14 च्या आकडेवारीनुसार देशभरात 1.6 लाख बँक एटीएम आहेत. एटीएम बसविण्यासाठीचा खर्च आणि देखभाल यासाठी शुल्क आकारले जावे अशी विनंती बँक असोसिएशनने केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
यांना सवलत कायम : छोटय़ा, नो फ्रील्स किंवा बेसिक सेव्हिंग खातेधारकांना पूर्वीप्रमाणोच एटीएमचा पाच वेळा नि:शुल्क वापर करता येईल. सहा मेट्रो शहरांखेरीज अन्य ठिकाणी पूर्वीचीच पाच वेळा नि:शुल्क एटीएम सेवेची सुविधा कायम असेल.