Join us

आजचा बँक संप टळला

By admin | Updated: January 7, 2015 02:33 IST

बँकांमधील सुमारे आठ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बुधवारी, ७ जानेवारी रोजी होणारा संप पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई: ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (आयबीए)ने आधीहून थोड्या अधिक पगारवाढीचा देकार देऊन त्यावर पुढे वाटाघाटी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्याने देशभरातील सरकारी व खासगी व्यापारी बँकांमधील सुमारे आठ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बुधवारी, ७ जानेवारी रोजी होणारा संप पुढे ढकलण्यात आला आहे.आधीच्या वेतन कराराची मुदत संपल्यानंतर बँक व्यवस्थापनांची ‘आयबीए’ ही संघटना आणि बँक कर्मचाऱ्यांच्या आठ प्रमुख देशव्यापी संघटनांचा ‘युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स’ (यूएफबीयू) हा महासंघ यांच्यातील वाटाघाटी फिसकटल्यानंतर या लाक्षणिक संपाची घोषणा करण्यात आली होती. कर्मचारी संघटनांनी २३ टक्के पगारवाढीची मागणी केली होती, तर ‘आयबीए’ ११ टक्क्यांच्या पुढे जायला तयार नव्हती.सोमवारी दिल्लीत केंद्रीय श्रम आयुक्तालयातील ‘कन्सिलिएशन आॅफिसर’पुढे ‘आयबीए’ने वाटाघाटी पुढे सुरू करण्याची तयारी दर्शविली होती.