Join us
Daily Top 2Weekly Top 5

केईएममध्ये आज काम बंद आंदोलन

By admin | Updated: December 4, 2014 01:26 IST

केईएम रुग्णालयातील कामगार आणि कर्मचारी वर्गाने रुग्णालय प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : केईएम रुग्णालयातील कामगार आणि कर्मचारी वर्गाने रुग्णालय प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या आंदोलनामुळे रुग्णांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. केईएममधील कर्मचाऱ्यांचे साधेसाधे प्रश्न अनेकदा चर्चा करूनही सुटलेले नाहीत, सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नावर आठ महिन्यांपासून चर्चा होत असूनही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही, अशा सर्वच बाबींमुळे संतप्त झालेले कामगार आणि कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबरऐवजी आता उद्या, ४ डिसेंबरलाच सकाळी ७ वाजल्यापासून काम बंद आंदोलन पुकारले असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सेक्रेटरी महेश दळवी यांनी सांगितले. या काम बंद आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)