Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज ठाण्यात पाणी नाही

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

सिद्धेश्वर जलकुंभ आणि टेकडी बंगला जलकुंभ येथे आऊटलेट जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे - ठाणे महापालिकेच्या वतीने सिद्धेश्वर जलकुंभ आणि टेकडी बंगला जलकुंभ येथे आऊटलेट जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या काळात कोलबाड, खोपट, गोकुळनगर, चरई, धोबीआळी, एडलजी रोड, आंबेडकर रोड, विकास कॉम्प्लेक्स, एलबीएस रोड, चंदनवाडी, सिद्धेश्वर तलाव परिसर, हंसनगर, टेकडी बंगला, नामदेववाडी, भक्ती मंदिर, आराधना सिनेमा, कचराळी तलाव परिसर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)