Join us  

आज ठाण्यात पाणी नाही

By admin | Published: January 27, 2015 11:23 PM

स्टेम कंपनी व ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेवर अत्यंत तातडीची निगा, देखभाल व अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येत

ठाणे : स्टेम कंपनी व ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेवर अत्यंत तातडीची निगा, देखभाल व अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने बुधवारी २८ रोजी सकाळी ९ ते गुरुवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत पाचपाखाडी, ऋतु पार्क, साकेत, महागिरी, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकुजिनीवाडी, विजयनगरी, घोडबंदर रोड परिसर व खारटन रोड परिसर भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)