ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी अत्यंत तातडीची निगा, देखभाल व आवश्यक दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हे शटडाऊन घेण्यात आले असून या कालावधीत कोलशेत, बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड, खारेगाव, मुंबई पुणे रोड, मुंब्रा - कौसा आदी भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरीकांनी या कामी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे मनपाने केले आहे. (प्रतिनिधी)
आज ठाण्याच्या काही भागात पाणी नाही
By admin | Updated: December 19, 2014 00:00 IST