Join us

आज ठाण्यात वीज नाही

By admin | Updated: November 20, 2014 23:32 IST

महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे : महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यानुसार मानपाडा, टिकुजिनीवाडी रस्ता, जयभवानीनगर, अग्रवाल इस्टेट, आकांक्षा गार्डन, युनी अ‍ॅबेक्स, युनिव्हर्सल फेरो, तत्त्वज्ञान विद्यापीठ ते गांधीनगर या भागांतील वीजपुरवठा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच डोंगरीपाडा, विजयनगरी, स्वस्तिक रिगालिया, वसंत लीला, गार्डन कोर्ट, विजय अ‍ॅनेक्स, वाघबीळ गाव, विजय एनक्लेव्ह, पूजा कॉम्प्लेक्स, हाफी इलेक्ट्रा, फोरधाम प्रेसिंग, कार्यकारी अभियंता मीरा-भार्इंदर पाणीपुरवठा विभाग तसेच फुलेनगर, दत्तवाडी, जुना मुंबई-पुणे रोड, गोविंदधाम सोसायटी, साईबाबानगर, सुदामा सोसायटी, एनएमएम सोसायटी, सुकुर पार्क, रेल्वे कॉर्टर, शंकर मंदिर, टाकोली मोहल्ला, जुना बेलापूर रस्ता, मनीषानगर, कळवा नाका, स्टेशन परिसर या भागातील वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)