Join us  

मध्य रेल्वेवर आज विशेष पॉवर ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 6:27 AM

मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकावर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ट्रॅफिक आणि विशेष पॉवर ब्लॉक रविवारी मध्यरात्री१२.४५ ते सोमवारी सकाळी ६.४५ या वेळेत घेण्यात येणार आहे.

मुंबई  - मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकावर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ट्रॅफिक आणि विशेष पॉवर ब्लॉक रविवारी मध्यरात्री१२.४५ ते सोमवारी सकाळी ६.४५ या वेळेत घेण्यात येणार आहे. नवीन एफओबी गर्डरची सुरुवात करण्यासाठी ५ व ६ क्रमांकाच्यारेल्वे रुळावर ब्लॉक घेण्यात येईल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री १२.२८ वाजता ठाण्याला जाणारी आणि ठाण्यावरून सकाळी ४.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी या दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसवर येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या निर्धारित वेळेनुसार १ तास ३० मिनिटे व २ तास ३५ मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ दादरला येणा-या अप मेल/ एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सोमवारी रात्री २.२० ते ४.२० वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच या गाड्या निर्धारित वेळेनुसार २० मिनिटे उशिराने पोहोचतील.११०६२ दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२५४१ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, ११०१६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस या गाड्या ठाणे स्थानकावर थांबा घेतील. १२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी रत्नागिरी एक्स्प्रेस ही गाडी सोमवारी सकाळी ५.२३ वाजता न सुटता सकाळी ६.५५ वाजता सुटेल.१५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस व्हाया अलाहाबाद ही गाडी सोमवारी सकाळी ६.३५ वाजता न सुटता सकाळी ७.०५ वाजता सुटेल. १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टनम् एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ६.५५ वाजता न सुटता सकाळी ८.३० वाजता सुटेल. ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-दरभंगा एक्स्प्रेस सोमवारी दुपारी १२.१५ वाजता न सुटता दुपारी १४.२० वाजता सुटेल.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेमुंबई लोकल