Join us

आज सीएसटीहून शेवटची लोकल रात्री ११.१८ वाजता

By admin | Updated: June 6, 2015 02:02 IST

शनिवारी (६ जून) रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) कायमस्वरूपी परावर्तनाचे अखेरचे काम केले जाणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर सीएसटी ते ठाणेदरम्यान शनिवारी (६ जून) रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) कायमस्वरूपी परावर्तनाचे अखेरचे काम केले जाणार आहे. या कामामुळे शनिवारी रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी कर्जतसाठी शेवटची जलद लोकल सीएसटीहून सोडण्यात येणार आहे. यानंतर लोकल सुटणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तर सीएसटीहून रविवारी पहाटेची पहिली धीमी लोकल अंबरनाथसाठी ६.१६ वाजता सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर सीएसटी ते ठाणेदरम्यान डीसी ते एसी परावर्तनाची गेल्या काही दिवसांपासून चाचणी घेण्यात आली. या कामासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे. या कामामुळे शनिवारी कर्जतसाठी रात्री ११.१८ वाजताची जलद लोकल सोडण्यात येणार असून, शेवटची धीमी लोकल कल्याणसाठी रात्री १0.४३ वाजताची असेल. तर टिटवाळासाठी सेमी फास्ट लोकल सीएसटीहून रात्री १0.५0 वाजता सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सीएसटीहून नेहमी शेवटची लोकल रात्री साडे बारा वाजता कर्जतसाठी सोडण्यात येते. पहाटे सीएसटीहून पहिली लोकल ४.१२ वाजता सोडण्यात येते. परावर्तनाच्या कामामुळे रविवारी पहाटे पहिली लोकल सीएसटीहून अंबरनाथसाठी ६.१६ वाजताची धीमी लोकल असेल; तर त्यानंतर थेट सीएसटीहून ६.३२ वाजता टिटवाळा धीमी लोकल सोडण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे ते कल्याण दरम्यानच्या लोकल सेवांवरही परिणाम होणार आहे. काही लोकल रद्द केल्या जातील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.शनिवारी रात्री सीएसटीकडे येणारी शेवटची लोकलकसाराहून सीएसटीकडे येणारी शेवटची लोकल २१.२१ वा. सुटेल. कर्जतहून सीएसटीकडे येणारी शेवटची लोकल २१.१५ वाजता सुटेल.कर्जतहून सीएसटीकडे येणारी पहिली जलद लोकल पहाटे ५.२0 वाजता सोडण्यात येईल. आसनगावहून सीएसटीकडे येणारी पहिली धीमी लोकल ५.३३ वा. सोडणार. ठाणेहून सीएसटीकडे येणारी पहिली धीमी लोकल ६.२२ वाजता सोडण्यात येईल. कुर्ल्याहून सीएसटीकडे येणारी पहिली लोकल ६.२२ वाजता सुटेल.