Join us

म्हाडाच्या घराच्या नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९८४ घरांसाठी १ लाख २१ हजार ३६१ जणांनी नोंदणी केली आहे. १ ...

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९८४ घरांसाठी १ लाख २१ हजार ३६१ जणांनी नोंदणी केली आहे. १ लाख ४८ हजार ६३४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. १ लाख १० हजार ५६३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. तर २२ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हाडाच्या घरांकरिता अर्ज करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर नोंदणी केलेल्या अर्जदारांना २३ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृह प्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याकरिता सदनिकांच्या वितरणासाठी प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे.