Join us

संमतीपत्रे देण्याचा आज अखेरचा दिवस

By admin | Updated: October 6, 2014 04:07 IST

विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली संमतीपत्रे देण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे.

नवी मुंबई : विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली संमतीपत्रे देण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आज रविवार असूनही संमतीपत्रे देण्यासाठी पनवेल येथील मेट्रो सेंटरवर प्रकल्पग्रस्तांची एकच झुंबड उडाली होती. असे असले तरी आतापर्यंत केवळ साठ टक्के प्रकल्पग्रस्तांनीच संमतीपत्रे दिले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर मागील दहा दिवसांत संमतीपत्रे देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची मेट्रो सेंटरवर झुंबड उडाली आहे. सोमवारी एका दिवसात उर्वरित ४0 टक्के प्रकल्पग्रस्तांची संमतीपत्रे घेण्याचे कठीण काम मेट्रो सेंटरला करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी शासकीय सुट्टी असली तरी प्रकल्पग्रस्तांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी मेट्रो सेंटर उद्याही सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)