Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By admin | Updated: November 1, 2014 23:59 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणो मार्गावरील अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरुळ-मानखुर्द अप/डाऊन दिशेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणो मार्गावरील अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरुळ-मानखुर्द अप/डाऊन दिशेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स.1क्.3क् ते दु. साडे तीन या कालावधीत घेण्यात येणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत अप जलद मार्गावर उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या ब्लॉकमुळेच र}ागिरी-दादर ही गाडी दिवा स्थानकातच रद्द करण्यात आली असून ही गाडी दिवा स्थानकातूनच परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील नेरुळ- मानखुर्द मार्गावर अप/डाऊन दिशांवर ब्लॉक असल्याने स. 11 ते दु. 3 या कालावधीत सीएसटी ते बेलापूर/वाशी/पनवेल या ठिकाणी अप/डाऊन दोन्ही दिशांवरील गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सीएसटी-मानखुर्द तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणो - पनवेल या दोन्ही मार्गावर अप/डाऊन दिशांवर विशेष लोकल धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत आहे त्याच तिकिट/पासावर ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवासाची मुभा असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 
पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन जंबोब्लॉक
4डोंबिवली - विरार-वसई स्थानकादरम्यान रविवारी पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मध्यरात्री 12 ते पहाटे 4.1क् र्पयत अप/डाऊन दिशेवर असेल. या कालावधीत या स्थानकांदरम्यान ओव्हर हेड वायर, सिगAल यंत्रणा, रुळ आदीची देखभाल करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.