Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊंचा आज जन्मसोहळा

By admin | Updated: January 11, 2015 22:39 IST

राजमाता जिजाऊ यांचा ४१७ वा जयंती सोहळा सोमवारी १२ रोजी किल्ले रायगडाच्या पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळी आयोजित करण्यात आला आहे.

महाड : राजमाता जिजाऊ यांचा ४१७ वा जयंती सोहळा सोमवारी १२ रोजी किल्ले रायगडाच्या पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळी आयोजित करण्यात आला आहे. जिजाऊंच्या समाधीस्थळी असलेल्या राजमाता राजवाड्यात हा जयंती उत्सव आयोजिण्यास केंद्रीय पुरातत्व विभागाने खोडा घातल्याने वनविभागाच्या आवारात समाधीस्थळी हा उत्सव होणार आहे. रायगड जिल्हा परिषद व स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने या निमित्त भव्यदिव्य कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेने पाच लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती रघुवीर देशमुख व सरपंच ज्योती गायकवाड यांनी दिली.दरम्यान, राजमाता राजवाड्याची अत्यंत दुरवस्था झाली असून राजवाड्यात सध्या पुरूषभर गवत वाढले असून त्याचे भान पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना राहिलेले नाही. या कार्यक्रमानिमित्त सोमवारी सकाळी ९ वा. अभिषेक व पूजा, १२ वा. जिजाऊ जन्मसोहळा, सायंकाळी ५ ते ७ पर्यंत जिजाऊंच्या पालखीची शाही मिरवणूक, तसेच रात्री १० वा. शाहीर सावंत यांचा शाहिरी रात्र हा कार्यक्रम होईल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी मंत्री सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, माणिक जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे उपस्थित राहतील. (वार्ताहर)