Join us
Daily Top 2Weekly Top 5

टोलविरोधात आज राष्ट्रवादी रस्त्यावर

By admin | Updated: March 24, 2015 00:03 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांबाबत आवाज उठवूून आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता टोल विरोधात एल्गार पुकारला आहे.

खालापूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांबाबत आवाज उठवूून आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता टोल विरोधात एल्गार पुकारला आहे. उद्या मंगळवारी २४ मार्च रोजी राज्यभर टोलनाक्यांविरोधात आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून सावरोली टोलनाक्यावरही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल.
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ सावरोली येथे टोलनाक्यावर हे आंदोलन केले जाईल. आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला रायगड जिल्हयातील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेउपस्थित राहतील. महाराष्ट्रातील महामार्गांना घेवू द्या मोकळा श्वास, टोलमुक्त महाराष्ट्र हाच आमचा ध्यास असा नारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. (वार्ताहर)