Join us  

तंबाखूचे व्यसन सुटेना; १०% रुग्णच समुपदेशनास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 2:13 AM

तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असताना, दुसरीकडे मात्र तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी येणारे रुग्ण समुपदेशनाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असताना, दुसरीकडे मात्र तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी येणारे रुग्ण समुपदेशनाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. शासकीय दंत महाविद्यालयात तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तंबाखूमुक्ती व्यसन केंद्रात येणाऱ्या रुग्णांपैकी केवळ १० टक्के रुग्णच समुपदेशनासाठी तयार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शासकीय दंत महाविद्यालयात १७ आॅक्टोबर रोजी तंंबाखमुक्ती व्यसन केंद्र सुरू झाले. गेल्या तीन महिन्यांत या व्यसनमुक्ती केंद्रात विविध वयोगटांतील १,२०० रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले. नव्या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पंधरवड्यात ९१८ रुग्णांची या केंद्रात नोंद झाली. केंद्रात दाखल झालेल्या एकूण रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटांतील पुरुष रुग्णांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. ईश्वरन रामस्वामी यांनी दिली. त्या खालोखाल महिला रुग्ण आहेत, तसेच यात १५ ते ३५ वयोगटांतील १० टक्के तरुणपिढीचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. या केंद्रात दाखल होणाºया रुग्णांमध्ये शहरातील रुग्ण अधिक असून हे मध्यमवर्गीय आहेत.तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी येणाºया रुग्णांना या केंद्रात विविध प्रकारच्या समुपदेशन प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यात वैयक्तिक, सामूहिक आणि प्रगत समुपदेशन अशा विविध टप्प्यांद्वारे या सवयींपासून मुक्तता मिळते. तीन महिन्यांत केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांपैकी अवघ्या १२४ जणांनी प्राथमिक टप्प्यातील समुपदेशनाची तयारी दाखविली. त्यानंतर, दुसºयात टप्प्यात त्यातील ८१ रुग्णांनी समुपदेशनात खंड पाडला, तर अखेरच्या टप्प्यात केवळ ४३ रुग्णांनी या समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण केल्याचे डॉ. रामस्वामी यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्याकडे कल आहे. जेणेकरून कोणत्याही रुग्णांनी समुपदेशनाची प्रक्रिया अपूर्ण न सोडता पूर्ण करून या केंद्रातून व्यसनमुक्त होऊन जावे, हा उद्देश असल्याचे डॉ. रामस्वामी यांनी सांगितले.मुखाचा कर्करोग; पूर्व लक्षणांवर त्वरित उपचारया केंद्रात उपचारार्थ आलेल्या काही रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाची पूर्व लक्षणे आढळल्यास, त्यावर केंद्रात उपचार करण्यात येतात. त्यानुसार, यातील काही रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. केंद्रात येणाºया रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास टाटा रुग्णालयात त्याला उपचारांसाठी पाठविण्यात येते, अशी माहिती डॉ. रामस्वामी यांनी दिली.

टॅग्स :मुंबई