Join us
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सुटण्यासाठी तृतीयपंथ्यांनी घेतली कीर्तिकरांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 8, 2024 19:57 IST

गोरेगाव विधानसभा समन्वयक समीर देसाई,माजी नगरसेवक राजू पाध्ये उपस्थित होते.

मुंबई-27 उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रात एकूण 61 तृतीयपंथी आहेत.त्यांच्या शिष्टमंडळाने आज गोरेगाव पश्चिम रत्ना हॉटेल समोरील  निवडणूक कार्यालयात उद्धव सेनेचे येथील उमेदवार अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या आणि त्या सोडवण्याची मागणी केली.यावेळी गोरेगाव विधानसभा समन्वयक समीर देसाई,माजी नगरसेवक राजू पाध्ये उपस्थित होते.

यावेळी तृतीयपंथी पूजा शिंदे यांनी सांगितले की,आमचे नोकरी, प्रशिक्षण,रोजगार,सुरक्षा आदी प्रश्न आहेत प्रश्न संसदेत मांडा.तसेच पुणे,पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तृतीय पंथ्यांना जशी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली,तशी मुंबई महानगर पालिकेने तृतीय पंथ्यांसाठी नोकरीची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली.आम्हाला हिणवले जाते, आम्हाला समाजाने सन्मानाने वागणूक दिली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

यावर भाष्य करतांना कीर्तिकर म्हणाले की,शिवसेनाप्रमुखांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी शिकवण आम्हाला दिली आहे.तुमच्या साठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे.भविष्याचा विचार करून तुमच्या समस्या काय आहेत याचा अभ्यास करून व सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून संसदेत त्या मांडून संविधाना प्रमाणे तुमचे न्याय व हक्क आम्ही मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबई