Join us

टीएमटीला लाभणार २२० बसेस

By admin | Updated: November 3, 2014 23:31 IST

महापालिका परिवहनच्या ताफ्यात १० व्होल्व्हो दाखल झाल्यानंतर आगामी काळात आणखी २२० बसेस नव्याने दाखल होणार आहेत

ठाणे : महापालिका परिवहनच्या ताफ्यात १० व्होल्व्हो दाखल झाल्यानंतर आगामी काळात आणखी २२० बसेस नव्याने दाखल होणार आहेत. परंतु सध्या परिवहनची स्थिती पाहिल्यास ३१३ बस पैकी ९१ बस या पूर्वीच स्क्रॅपमध्ये काढण्यात आल्या आहेत. तसेच ७५ बसचे आयुर्मान देखील संपलेले आहे. त्यात रस्त्यावर प्रत्यक्षात १६० ते १७० बसेस धावत आहेत. त्यातील सुध्दा काही बसेसचे बंद पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे सध्या असलेल्या बसेसची संख्या ही या ना त्या कारणाने कमी होणार असल्याने नव्या ज्या बसेस परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. त्या जुन्याचीच जागा घेणार असल्याने प्रवाशांना या नव्या बसचा अतिरिक्त फायदा कितपत होणार हे देखील सांगणे परिवहनला कठीण झाले आहे.