खर्डी : शेकडो कुटुंबांना पाणी पुरविणा-या बोअरवेलच्या मोटारीचे जवळपास ३२ हजार रुपये वीजबिल थकल्याने महावितरणने दोन दिवसांपूर्वी तिची वीज खंडित केली.ग्रामपंचायतीने स्टेशन परिसरातील महात्मा फुले कॉलनी, गायत्रीनगर, गवळीनगर या पाणीटंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारी दवाखान्यातील बोअरवेल दुरुस्त करून नवीन पम्प लावून त्याला नवीन वीजमीटर जोडणी देऊन तिचे पाणी दलित वस्ती सुधार योजनेतून बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये नेऊन ते टंचाईग्रस्त भागाला पुरविले होते. स्टेशन विभागातील नागरिकांना टंचाईकाळात याच बोअरवेलचा आधार होता. परंतु, प्रशासनाचे दुर्लक्ष व सत्ताधाऱ्यांच्या साठमारीत या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे.
बिल थकल्याने बोअरवेलची वीज तोडली
By admin | Updated: December 2, 2014 00:33 IST