Join us

अत्याचाराला कंटाळून मुंबईत

By admin | Updated: February 22, 2015 02:29 IST

घरमालकाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकाच कुटुंबातल्या चौघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात घडली.

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्यामुंबई : घरमालकाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकाच कुटुंबातल्या चौघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात घडली. यात बहीण, भाऊ, वृद्ध आई आणि आईचा दुसरा पती अशा चौघांचा सहभाग आहे. आरोपी घरमालकाचे नाव टिंकू सिंग (४०) असे असून, तो बॉलीवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करतो. ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे चौघांनी आत्महत्येपूर्वी मोबाइलमध्ये स्वत:चे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ठेवले होते. त्यात मी का आत्महत्या करतो, याचे कारण सांगितले आहे.भारती कार्तिक पाल (२४, मुलगी), सोमनाथ कार्तिक पाल (२०, मुलगा), शिखा कार्तिक पाल (४५, आई) आणि मनोज अजितकुमार पटेल (५०, आईचा दुसरा पती) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात धाडले आहेत. यापैकी भारती आणि सोमनाथ यांचे मृतदेह काल संध्याकाळी लोखंडवाला संकुलातील शिशिरा इमारतीतील टिंकू सिंग याच्या फ्लॅटमध्ये सापडले. दोघांनी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या घडली तेव्हा टिंकू सिंग, त्याची बहीण पूनम सिंग आणि भाची दिशा हे तिघेही याच फ्लॅटमध्ये बेडरूममध्ये होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी भारती, सोमनाथ यांनी या तिघांना हॉलची साफसफाई करायची आहे, असे सांगून बेडरूममध्ये धाडले. तिघे बेडरूममध्ये गेल्यानंतर दोघांनी दरवाजा बाहेरून बंद केला आणि आत्महत्या केली. हे दोघे सुमारे १० वर्षांपासून टिंकू सिंग यांच्या घरी घरकाम करीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर चौकशी सुरू झाली. चौकशीत या दोघांची आई शिखा घटस्फोटीत असून मनोज पटेल नावाच्या व्यक्तीसोबत लोखंडवाला संकुलातच वास्तव्यास आहे. आईचे मनोजसोबतचे संबंध दोन्हीमुलांनापटत नव्हते. त्यांच्यात वाद होत होते. यातूनच दोघांनी आत्महत्या केली असावी असा दावा टिंकूसिंग व त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांसमोर केला. त्यानुसार पोलीस शनिवारी सकाळी लोखंडवाला संकुलातील मॉन्टेना इमारतीतील मनोज यांचा फ्लॅटवर धडकले. पोलिसांना टिंकूसिंग यांनी केलेल्या दाव्याची शहानिशा करायची होती. मात्र फ्लॅट आतून बंद होता. बराचवेळ झाला तरी दरवाजा कोणी उघडत नव्हते. अशात पोलीस कंटाहून माघारी परतले. मात्र संशय वाटू लागल्याने पोलीस पुन्हातेथे गेले. अग्निशमन दलाच्या मदतीने मनोज यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा शिखा व मनोज यांचेही पंख्याला लटकलेले मृतदेह पोलिसांना आढळले.याप्रकरणी सुरूवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र नंतर सुसाईड नोट, व्हीडीओ रेकॉर्डींग समोर आल्यानंतर या प्रकरणी आरोपी घरमालकाविरोधात विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी आम्ही अधिक तपास करतआहोत, अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुभाष वेळे यांनी लोकमतला दिली. घरात सापडले अंत्यसंस्काराचे सामानभारती, सोमनाथ यांनी आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले साहित्य आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. व्हीडीओ रेकॉर्डींग : चौघांनी आत्महत्येपुर्वी व्हीडीओ रेकॉर्डींग केल्याची बाब तपासात समोर आली. भारती आणि सोमनाथ यांनी या रेकॉर्डींगमध्ये टिंकूसिंगच्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हंटल्याचे समजते. टिंकूने अनेकदा माझ्यासोबत अश्लिल चाळे केले. त्याच्या या जाचामुळे मला जगायची इच्छा नाही. मात्र टिंकूला कठोर शासन करा, असे भारती म्हणते. तर सोमनाथने टिंकूने मला अनेकदा मारहाण केली. तो माझ्या बहिणीशी अश्लिल चाळे करायचा, असे म्हंटले आहे. शिखाने, मुलेच आत्महत्या करत असतील तर मी तरी जगून काय करू असे नमूद केले आहे. मनोज यांनी आजारपणामुळे आत्महत्या करत असल्याचे रेकॉर्डींगमध्ये सांगितल्याचे समजते.भारती व सोमनाथ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मनोज यांच्या घरी जाऊन आईची भेट घेतली होती. तेव्हा भारतीने आपली सुसाइड नोट आईच्या हाती दिली. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून टिंकू सिंग आपले लैंगिक शोषण करतो. आता हा जाच सहन होत नसल्याने मी आत्महत्या करणार आहे, असे लिहिले होते. ही सुसाइड नोट ओशिवरा पोलिसांना मनोज यांच्या फ्लॅटमध्ये सापडली आहे.