Join us

या वेळी आम्ही मतदान करणारच!

By admin | Updated: September 19, 2014 01:12 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह दिसून येत आहे. मतदार नोंदणीसाठी अखेरच्या क्षणी हजारो नवमतदारांनी धावपळ केली. मतदार यादीत नाव नोंदवून घेण्याचा निश्चय केला

नवमतदारांचा निर्धार : मतदार नोंदणीच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह दिसून येत आहे. मतदार नोंदणीसाठी अखेरच्या क्षणी हजारो नवमतदारांनी धावपळ केली. मतदार यादीत नाव नोंदवून घेण्याचा निश्चय केला आणि यंदाच्या विधानसभेला मी मतदान करणारच असा जणू विडाच तरुणाईने उचललेला दिसत आहे. मुंबई शहरात तब्बल 29 हजारांहून अधिक नवमतदारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर उपनगरातील नवमतदारांनीही 2क् हजारांपेक्षा अधिक संख्येने मतदान नोंदणी अभियानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नवमतदारांचा कौल यंदाच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे..
उपनगरातही नोंदणीला चांगला प्रतिसाद
सचिन लुंगसे ल्ल मुंबई 
विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान करता यावे आणि मतदार यादीत नाव समाविष्ट व्हावे म्हणून 17 सप्टेंबर या अखेरच्या दिवशी मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातील तब्बल 2क् हजार 416 नागरिकांनी मतदार नोंदणी कार्यालयात अर्ज क्रमांक सहा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या सुजाण नागरिकांमध्ये तरुणाईचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असून, आता कागदपत्रंची पडताळणी झाल्यानंतर अर्ज क्रमांक सहा दाखल केलेल्या नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान ओळखपत्र असूनही केवळ मतदार याद्यांमध्ये नावांचा समावेश नसल्याच्या कारणास्तव अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. तत्पूर्वी मतदार याद्यांमध्ये नावांचा समावेश व्हावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. शिवाय मतदार यादीत नाव नाही; अशा नागरिकांना अर्ज क्रमांक सहा भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना मतदानापासून वंचित राहू लागू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मोहीम हाती घेतली होती. 
17 सप्टेंबर या अखेरच्या नावनोंदणीच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच मतदान नोंदणी कार्यालयांत झुंबड उडाली होती. पहाटेपासून सुरू झालेला हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम रात्री उशिरार्पयत सुरू होता. दरम्यान, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदार याद्यांमधील ज्यांची नावे वगळण्यात आली होती, अशा 6 लाख 13 हजार मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अर्ज क्रमांक-6 स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 775 मतदारांकडून अर्ज मिळाल्याची पोचपावती मिळाली होती. त्यापैकी 4 लाख 4 हजार 426 मतदारांची पत्रे परत आली होती.
 
मुंबई शहरात 
75 हजार नवे मतदार
चेतन ननावरे ल्ल मुंबई 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान राबवलेल्या मतदार नोंदणी अभियानात मुंबई शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांतून 29 हजार 292 नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. त्याआधी लोकसभा निवडणुकीनंतर 31 जुलैर्पयत झालेल्या मतदार नोंदणीत 47 हजार 582 नव्या मतदारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे 75 हजार नव्या मतदारांची भर पडणार आहे.
यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या जनजागृतीमुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मतदार नोंदणी झाल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला पालिका प्रशासनाच्या विविध आस्थापनांनी योग्य मदत केल्याचेही त्यांनी सांगितले. नव्या अर्जाबाबत सांगताना पाटोळे म्हणाल्या, ‘मतदार नोंदणीसाठी दाखल केलेल्या अर्जाची छाननी केली जाईल. त्यात चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरलेले अर्ज बाद होतात. शिवाय अपूर्ण कागदपत्रंची पूर्तता करणा:या अर्जानाही अपात्र ठरवले जाते. पात्र ठरलेल्या अर्जाची यादी विभागीय कार्यालयांबाहेर प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर कोणताही आक्षेप किंवा हरकत घेतली नसेल, त्या नावांचा समावेश मतदार यादीत केला जाईल. या प्रक्रियेस सुमारे 7 ते 1क् दिवसांचा कालावधी लागतो.’
अपात्र ठरणा:या अर्जाची संख्या तुलनेने फारच कमी असते. त्यामुळे जमा झालेल्या अर्जामधील किमान 28 हजार अर्ज तरी पात्र होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर नोंद केलेल्या सुमारे 47 हजार मतदारांची भर पडल्यास नव्या मतदारांचा आकडा 75 हजारांच्या घरात जाईल.  याशिवाय नावे वगळण्यासाठी 1 हजार 249 मतदारांनी अर्ज केले आहेत. तर नावात बदल करण्यासाठी 5 हजार 644 मतदारांचे अर्ज आले आहेत. पत्त्यात बदल करण्यासाठीही 248 मतदारांनी अर्ज दाखल केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले.