Join us  

घरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 5:18 AM

राज्यात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक रस्ते अपघात

- महेश चेमटे 

मुंबई : सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रस्ते मार्गाने घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कारण राज्यात सायंकाळी ६ ते ९ ही वेळ सर्वाधिक अपघातांची वेळ ठरली आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये राज्यातील एकूण ३५ हजार ८५३ अपघातांपैकी ६ हजार ८३ अपघात ३ तासांतच झाले आहेत.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकताच रस्ते अपघातांविषयी अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक ६ हजार ८३ अपघात झाले आहेत. सर्वाधिक कमी अर्थात २ हजार ५५७ अपघात मध्यरात्री ३ ते पहाटे ६ या वेळेत झाले.

राज्यात ३५ हजार ८५३ अपघातांमध्ये १२ हजार २६४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये १२ हजार ९३५ अपघाती मृत्यू राज्यात नोंदविण्यात आले होते. तथापि देशातील रस्ते अपघातांच्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्र तिसºया स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. राज्यात विविध अपघातांत २० हजार ४६५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून ११ हजार ६६३ प्रवासी जखमी झाले आहेत.

२०१७ च्या मे महिन्यात ३ हजार ३९५ अपघात झाले असून एक हजार २५० प्रवाशांचा मृत्यू झाला.

टॅग्स :मृत्यू