मुंबई : रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, अशा सूचना नेहमीच सर्वच रेल्वे स्थानकांवर ऐकायला मिळतात. मात्र मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात राहणाऱ्या रहिवाशांना या सूचनेकडे दुर्लक्ष करून रोजच रेल्वे ट्रॅक पार करावा लागतो. कारण गेल्या २० वर्षांपासून पादचारी पुलाची मागणी करूनदेखील आजवर या ठिकाणी पूल न बांधल्याने रहिवाशांना नाइलाजास्तव ट्रॅक पार करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.मानखुर्द रेल्वे स्थानकातील एकमेव पादचारी पूल वगळता मानखुर्द ते वाशी या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर एकही पूल नाही. त्यामुळे सर्वांत मोठी गैरसोय महाराष्ट्र नगरवासीयांची होते. म्हाडा वसाहतीत प्रकल्पग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करण्यात येत असल्याने या ठिकाणी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रहिवाशांना खरेदीसाठी मानखुर्द पश्चिमेला जावे लागते. गेल्या काही वर्षांत रूळ पार करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे एखादा पूल किंवा स्कायवॉक मिळावा, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी खासदार आणि आमदारांना अनेकदा भेटून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र काहीही बदल झालेला नाही.
मानखुर्दमध्ये प्रवाशांवर रेल्वे ट्रॅक ओलांडण्याची वेळ
By admin | Updated: May 15, 2015 00:35 IST