Join us

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:09 IST

ड्रोनद्वारे ठेवणाऱ पार्टयावर नजर, गस्त, नाकाबंदीवर भरथर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्तड्रोनद्वारे पार्ट्यांवर नजर : गस्त, नाकाबंदीवर ...

ड्रोनद्वारे ठेवणाऱ पार्टयावर नजर, गस्त, नाकाबंदीवर भर

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त

ड्रोनद्वारे पार्ट्यांवर नजर : गस्त, नाकाबंदीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असून मुंबई पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांवर मुंबई पोलीस ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.

मुंबईत बसविलेल्या पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीस प्रत्येक घडामोडीवर मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवतील. मुंबईत नाइट कर्फ्यू असल्याने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, नाकाबंदी करण्यात येत आहे. या वर्षी कुठल्याच पार्टीला परवानगी देण्यात आली नाही. रात्री ११ नंतर घराच्या गच्चीसह सागरी किनाऱ्यावर जलोष करण्यास बंदी आहे. त्यात रेस्टॉरंट, पब, हुक्का पार्लरही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही काही मंडळी छुप्या पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करून वाहने आणि व्यक्तींची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

वाहतूक पोलिसांकडूनही ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग’ अशा मोहिमा राबविण्यात येत आहेत. हॉटेल, पब, बार व रेस्टॉरंट, दारूची दुकाने अशा आस्थापनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

* नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

मुंबईत एसआरपीएफच्या ९ तुकड्या, ६०० रक्षकांचा अतिरिक्त फाैजफाटा तैनात राहणार आहे. तसेच छेडछाडीचे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. साध्या गणवेशातील पोलीस सर्वत्र तैनात असतील. तर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले.

.......................