Join us

गणोशोत्सवादिवशी मंगळसूत्रंची चोरी

By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST

गणोश उत्सवाच्या दिवशीही दोन ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांत 65 हजार रूपयांचे दागिने मोटारसायकलस्वारांनी हिसकावले आहेत.

नवी मुंबई : गणोश उत्सवाच्या दिवशीही दोन ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांत 65 हजार रूपयांचे दागिने मोटारसायकलस्वारांनी हिसकावले आहेत. 
नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये रोज सोनसाखळी चोरीच्या घटना होत आहेत. धुमस्टाईल मोटारसायकल चालवून दागिने हिसकावणा:या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सण व उत्सवाच्या काळात चोरीच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शुक्रवारी गणोश उत्सवाच्या दिवशीही दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. ऐरोली सेक्टर 4 मधील रहिवाशी सोनाबाई हस्तीमल जैन या शुक्रवारी सकाळी 7 वाजता ए. आर. असोसिएशन या कार्यालयाचे शटर उघडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील 35 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. या प्रकरणी रबाळे पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाशी सेक्टर 9 मध्ये राहणा:या रेखा राजाराम सरफरे या शुक्रवारी सायंकाळी पावणोसात वाजण्याच्या सुमारास सेक्टर 15 मधील आयसीएल शाळेजवळून जात होत्या. मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील 3क् हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. या विषयी वाशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
4गणोश उत्सव काळात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. महिलांनी दागिन्यांची काळजी घ्यावी. चालताना पदपथाचा वापर करावा, शक्यतो उजव्या बाजूने चालावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विसजर्न तलावांवरही सुरक्षेसाठीची माहिती दिली जात आहे.