Join us

नेरूळच्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: April 14, 2015 02:37 IST

उरण-कंठवळी येथील डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या मंगेश घोरपडे (१९), संकेत धुरी (१९) व शैलेश कडाके (१९) या नेरूळ येथील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

उरण-कंठवळीतील घटनाउरण : उरण-कंठवळी येथील डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या मंगेश घोरपडे (१९), संकेत धुरी (१९) व शैलेश कडाके (१९) या नेरूळ येथील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर १६ व १८ मधील अष्टविनायक इमारतीतील १० तरुण सहलीसाठी उरण येथीन रानसई धरणावर गेले होते. या धरणाचे पाणी झऱ्यातून कंठवळी गावाकडे जाते. तेथे तयार झालेल्या डोहात एक जण पोहण्यास उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्याताना आणखी दोघे बुडाले. तासाभरानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व ते उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तिघांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर नेरूळ परिसरात शोककळा पसरली. परिसरातील महापालिका निवडणूक प्रचार काही काळ थांबविला गेला.