Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये तीन चाकी वाहन विक्रीत ६४ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

मुंबई : सण-उत्सवामुळे नोव्हेंबरमध्ये तीन चाकी वाहन विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ६४.९८ टक्के घट होऊन २४,१८५ वाहनांची विक्री ...

मुंबई : सण-उत्सवामुळे नोव्हेंबरमध्ये तीन चाकी वाहन विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ६४.९८ टक्के घट होऊन २४,१८५ वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ६९,०५६ वाहनांची विक्री झाली होती, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने(फाडा) दिली आहे.

फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, वाहन विक्री १९.२९ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी २२,६४,९४७ वाहन विक्री झाली तर यंदा १८,२७,९९० वाहने विकली गेली.

फाडाने म्हटले आहे की, नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि धनत्रयोदशीमुळे वाहन विक्री काही प्रमाणात वाढली.

प्रवासी वाहन विक्रीत ४.१७ टक्के वाढ होऊन २,९१,००१ झाली आहे. गेल्या वर्षी २,७९,३६५ वाहनांची विक्री झाली होती. १,४७२ प्रादेशिक कार्यालयांमधील १,२६५ कार्यालयांतील वाहन विक्रीची माहिती गोळा केली आहे. दुचाकी वाहनांची विक्री २१.४ टक्के घट होऊन १४,१३,३७८ झाली आहे, जी गेल्या वर्षी १७,९८,२०१ होती.

तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ३१.२२ टक्के घट होऊन ५०,११३ वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ७२,८६३ वाहने विकली गेली होती. तर यंदा ट्रॅक्टर विक्रीत ८.४७ वाढ झाली असून ४५,४६२ वरून ती संख्या ४९,३१३ वर पोहोचली आहे.