Join us  

तीन वॉर्डने पार केला दहा हजार रुग्णांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:13 AM

विलेपार्ले (पूर्व), अंधेरी (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या तीन भागांचा मिळून सुमारे साडेदहा लाख लोकसंख्येचा के पूर्व वॉर्ड आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र असून येथील पालिकेच्या के पूर्व, पी उत्तर व आर मध्य या तीन वॉर्डने आतापर्यंत कोरोना रुग्णांचा दहा हजाराचा आकडा पार केला आहे.तर के पश्चिम वॉर्डमध्ये १३ सप्टेंबरला कोरोनाचे एकूण ९८१२ रुग्ण होते.विलेपार्ले (पूर्व), अंधेरी (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या तीन भागांचा मिळून सुमारे साडेदहा लाख लोकसंख्येचा के पूर्व वॉर्ड आहे. पालिका प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार के पूर्व वॉर्डमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत एकूण कोरोनाचे ९३१० रुग्ण होते, १३ सप्टेंबरला १००२७ एकूण रुग्ण आहेत.या सात दिवसात एकूण ७१७ कोरोना रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंत ७९४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुंबईतील सर्वात जास्त ५६२ मृत्यू या वॉर्डमध्ये झाले आहेत.सध्या या वॉर्डमध्ये १५२४ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णवाढीचा दुपटीचा दर ६५ दिवसांवर गेला आहे. मालाड पूर्व व मालाड पश्चिम मिळून सुमारे १० लाख लोकसंख्येचा पी उत्तर वॉर्ड आहे. या वॉर्डमध्ये ६ सप्टेंबर रोजी ९२४९ एकूण कोरोना रुग्ण होते़ १३ सप्टेंबरला कोरोना रुग्णांची एकूण संख्या १००७९ झाली. या सात दिवसात या वॉर्डमध्ये ७३० कोरोना रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंत ८२९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचारादरम्यान ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या या वॉर्डमध्ये १५२४ रुग्णांवर उपचार सुरू असून वाढीचा दुपटीचा दर ५६ दिवसांवर गेला आहे.बोरीवली पूर्व व बोरीवली पश्चिम हे विभाग आर मध्य वॉर्डमध्ये येतात. या वॉर्डनेसुद्धा कोरोना रुग्णांचा दहा हजारांचा टप्पा पार केला असून १३ सप्टेंबरपर्यंत या वॉर्डमध्ये आतापर्यंत १०२२३ कोरोना रुग्ण होते. ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत या वॉर्डमध्ये १११८ कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर आतापर्यंत ७८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचारादरम्यान ३११ रुग्णांचा मृत्यू झाला. आता या वॉर्डमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत २०३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दुपटीचा दर ४२ दिवसांवर गेला आहे.विलेपार्ले, अंधेरी, जागेश्वरी(पू)मध्ये थैमानविलेपार्ले (पूर्व), अंधेरी (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या तीन भागांचा मिळून सुमारे साडेदहा लाख लोकसंख्येचा के पूर्व वॉर्ड आहे. पालिका प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार के पूर्व वॉर्डमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत एकूण कोरोनाचे ९३१० रुग्ण होते, १३ सप्टेंबरला १००२७ एकूण रुग्ण आहेत. या सात दिवसात एकूण ७१७ कोरोना रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंत ७९४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, मुंबईतील सर्वात जास्त ५६२ मृत्यू या वॉर्डमध्ये झाले आहेत.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस