Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात तीन हजार १४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरात शुक्रवारी तीन हजार १४५ नव्या काेराेना रुग्णांची नोंद झाली असून सध्या ५२ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यभरात शुक्रवारी तीन हजार १४५ नव्या काेराेना रुग्णांची नोंद झाली असून सध्या ५२ हजार १५२ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८४ हजार ७६८ झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के आहे. शुक्रवारी दिवसभरात तीन हजार ५०० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १८ लाख ८१ हजार ८८ रुग्ण काेराेनामुक्त झाले. दिवसभरात ४६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर, आतापर्यंत एकूण ५० हजार ३३६ जणांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ३६ लाख ८४ हजार ५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ८४ हजार ७६८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात दोन लाख २४ हजार ८५१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर दोन हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

.....................