अलिबाग : रायगड जिल्ह्यात पेण शहरात, अथ्रट गावात आणि कर्जतजवळच्या मार्केवाडी येथील एका खाजगी कार्यालयात चोरीच्या घटना घडल्या असून रोहा येथे आॅनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. पेण शहरातील ओंकार सोसायटीतील सुमारे ८० हजार रुपये किमतीचा वॉटरगेज त्याच्या व्हॉल्व्हसह गुरुवारी दुपारी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर नेरळजवळच्या अथ्रट गावातील ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे १२ हजार रुपये किमतीची तांब्याची कॉईल गुरुवारी सकाळी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्जतजवळच्या मार्केवाडी येथील एका खाजगी कार्यालयाच्या नोकराने त्याच कार्यालयातील कपाटाच्या ड्रॉव्हरमधील २० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एटीएम कार्डची वापर मर्यादा संपली आहे, ती वाढवण्याकरिता एटीएम पासवर्ड सांगा असे सांगून, पासवर्ड प्राप्त होताच, स्टेट बँक खातेदाराच्या खात्यातून ६८ हजार ९६४ रुपये काढून आॅनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध रोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बोर्लीपंचतन येथे बेकायदा मटका जुगार-बोर्लीपंचतनमधील गणेश चौक येथे एका घराच्या पडवीच्या आडोशाला स्वत:च्या फायद्याकरिता लोकांकडून पैसे घेऊन मेन नावाचा मटका जुगार चालविणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ हजार ९६० रुपयांच्या रकमेसह मटका जुगाराची साधने जप्त केली आहेत. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक नीलेश रावसाहेब सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवसात तीन चोऱ्या
By admin | Updated: July 17, 2015 22:31 IST