मुंबई : स्वाइनच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, गेल्या तीन दिवसांत शहर आणि उपनगरात स्वाइन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, स्वाइनचे नवीन ४९ रुग्ण आढळले असून, आॅगस्टमधील रुग्णांचा आकडा २२८पर्यंत गेला आहे.चेंबूर येथील २ वर्षांच्या मुलीचा स्वाइनमुळे १७ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. १५ आॅगस्टला राजावाडी रुग्णालयात या चिमुरडीला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नळ बाजार येथील ६३वर्षीय रुग्णाचा १३ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. पवई येथे राहणाऱ्या ७४वर्षीय महिलेला ६ आॅगस्ट रोजी होली स्पिरिट रुग्णालयात दाखल केले होते. १४ आॅगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या रोगापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केलेय. (प्रतिनिधी)
स्वाइनचे ३ बळी तीन दिवसांत नवे ४९ रुग्ण
By admin | Updated: August 18, 2015 02:13 IST