Join us

जलशुध्दीकरण केंद्राचे तीनतेरा

By admin | Updated: December 8, 2014 22:32 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नागोठणोहून पेण तालुक्याला पाणी पुरविणा:या शुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाली आहे. सध्या हे केंद्र निर्मनुष्य असल्याचा फायदा भुरटे घेत आहेत.

राजू भिसे ल्ल नागोठणो
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नागोठणोहून पेण तालुक्याला  पाणी पुरविणा:या शुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाली आहे. सध्या हे केंद्र निर्मनुष्य असल्याचा फायदा भुरटे घेत आहेत. जलशुध्दीकरणासाठी उपयोगी असणा:या महागडय़ा यंत्रसामग्रीसह लाखो रु पयांच्या वस्तू केंद्रातून गायब झाल्या आहेत. 
पेण तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी येथील वासगाव रस्त्यालगतच्या डोंगरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्रात नागोठणोतील के. टी. बंधा:यातून येणारे अशुद्ध पाणी शुध्द केले जाते आणि पेण तालुक्याला पुरवले जाते. या जलशुध्दीकरणाच्या उभारणीसाठी शासनाचे दहा ते वीस कोटी रु पये खर्च झाला आहे. ट्रीटमेंट प्लांट म्हणूनही या केंद्राचा उल्लेख केला जातो. 
गतवर्षी जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्याच देखरेखीखाली ती सहा महिने राबविण्यात आली. त्यानंतर ही योजना शासनाच्या ताब्यात देण्यात आली होती. प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदार नेमण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने अचानक दुर्लक्ष केल्याने जलशुध्दीकरण केंद्राला ग्रहण लागले. के. टी. बंधा:यातून जलवाहिनीद्वारे आणलेले अशुद्ध पाणी व ते शुध्द झाल्यानंतर ते साठवून पेणकडे रवाना करण्यासाठी या ठिकाणी 5.5 द. लक्ष आणि 6.7  द. लक्ष लीटर क्षमतेच्या दोन टाक्या, अद्ययावत इमारत, जलशुद्धीकरणासाठी भूमिगत टाकी तसेच त्यासाठी लागणारी यंत्नणा येथे उभारण्यात आली आहे. हे केंद्र बंद झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या केंद्राकडे पूर्णपणो दुर्लक्ष केले असून प्राधिकरणाकडून याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे चोरटय़ांचे फावते आहे. या केंद्राच्या कार्यालयातील टेबल, खुच्र्या, कपाटही चोरटय़ांनी पळवले आहे. या व्यतिरिक्त उच्चदाबाची इलेक्ट्रिक केबल, लहान-मोठे पाइप, इलेक्ट्रिक साहित्यासह काही मोटर्स, लोखंडी जिना, सिलेंडर, तांब्या-पितळेच्या पट्टय़ा तसेच केंद्राच्या इमारतीचा दरवाजा आणि इतर वस्तू चोरटय़ांनी लंपास केल्या आहेत. 
जलशुध्दीकरण केंद्राला विद्युत पुरवठा करण्यासाठी नागोठणो विद्युत वितरण कंपनीकडून तीन ट्रान्सफॉर्मर (रोहित्ने) उभारण्यात आली आहेत. येथील रोहित्नांची तोडफोड करून त्यातील महागडी यंत्रणाही चोरून नेली आहे. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुले या रोहित्नाजवळ आली असता, त्यातील गरम ऑईल त्यांच्या अंगावर व चेह:यावर पडून ते भाजले असल्याची घटना घडली होती. 
जलशुध्दीकरणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशीच खेळ सुरू आहे. प्रकल्पातील लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्या आहेत. याशिवाय सरकारी मालमत्तेची तोडफोडही करण्यात आली आहे. मात्र एमजेपीने याबाबत नागोठणो पोलीस ठाण्यात साधी तक्रारही नोंदवलेली नाही. 
 
माङयाकडील कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून जलशुध्दीकरण केंद्राकडे गेलेला नाही. वरिष्ठांशी चर्चा करून तुम्हाला माहिती देऊ.
- मारुती सातपुते, 
उपअभियंता, एमजेपी.