तीन ......तोल मोल के बोल
By admin | Updated: September 26, 2014 21:41 IST
राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडल्याने सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा आता कोणताही अधिकार नाही. राष्ट्रपती शासन राज्यात लागू करावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी घटनेनुसार निर्णय घेऊ असे आम्हाला सांगितले.
तीन ......तोल मोल के बोल
राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडल्याने सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा आता कोणताही अधिकार नाही. राष्ट्रपती शासन राज्यात लागू करावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी घटनेनुसार निर्णय घेऊ असे आम्हाला सांगितले. -एकनाथ खडसे, भाजप नेते ................................वेळ पडल्यास विरोधी पक्षात बसू पण सेना-भाजपसोबत जाणार नाही. आम्ही कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात सेना-भाजपबरोबर जाणार नाही. काँग्रेसने आम्हाला बरेच दिवस लटकवून ठेवल्याने आम्ही आघाडीतून बाहेर पडलो आहोत.-तारिक अन्वर, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस....................................राष्ट्रवादी गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात असल्याने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आश्चर्यकारक अजिबात नाही. काँग्रेसने आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादीच्या अवास्तव मागण्यांमुळे आघाडीचा शेवट झाला आहे. काँग्रेसला आता जनतेची साथ मिळेल.-अजय माकन, नेते, काँग्रेस.................................