तीन सिंगल बातम्या.....
By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST
म्हाडावासीय डासांमुळे त्रस्त
तीन सिंगल बातम्या.....
म्हाडावासीय डासांमुळे त्रस्त मुंबई: मुलुंड पूर्वेकडील म्हाडा वसाहतीत राहणारे नागरिक डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुन देखील दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. म्हाडा वसाहतीत सुमारे १५ हजार लोकवस्ती आहे. वसाहतीला लागून असलेला नाला तुंबल्यामुळे येथे दुर्गंधीबरोबर डासांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे स्थानिकांना कठीण होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली. मात्र वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मुलुंड कॉलनी म्हाडा असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक यांनी सांगितले. ....................विनयभंग करणारे अद्याप मोकाट मुंबई: कांदिवली येथील अंगणवाडी सेविकेला २५ ऑक्टोबर रोजी कार्यालयात घुसून १० ते १५ जणांच्या जमावाने मारहाण केली होती. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह, विनयभंगाचा गुन्हा आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आला होता. घटनेला १५ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना अटक करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे. ....................दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील अचानक मित्र मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही साई भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आयोजित कार्यक्रमातून जमा झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकर्यांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कृष्णा कदम यांनी सांगितले. ...................