Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीन थोडक्यात बातम्या....

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

रिक्षा चालकाला अटक

रिक्षा चालकाला अटक
मुंबई: महिला पत्रकाराचा विनयभंग करणार्‍या रिक्षा चालकास व्ही.बी. नगर पोलिसांनी अटक केली. रमेशकुमार जैस्वाल असे या आरोपीचे नाव असून १४ जुलैला महिला पत्रकार घरी जाण्यासाठी निघाली असता तिचे या आरोपीसोबत भांडण झाले होते. यावेळी त्याने महिलेला शिवीगाळ केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी आज त्याला अंधेरी परिसरातून अटक केली आहे.
...........................................
घरफोडी करणारे अटकेत
मुंबई: कंपनीतील २२ लाखांची रोकड घेऊन पळ काढणार्‍या दोन आरोपींना कुलाबा पोलिसांनी अटक केली. हर्षद सुर्वे आणि कुलदीप चव्हाण अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही कंपनीचे माजी कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी ही घटना कुलाबा परिसरात घडली होती. आरोपींनी बनावट चावीच्या सा‘ाने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.
................................................
मुलींना घरी पाठवले
मुंबई: उत्तर प्रदेशातून पळून आलेल्या आठ मुलींना माय होम इंडिया या संस्थेतर्फे पुन्हा घरी पाठवण्यात आले आहे. घरातील भांडणांमुळे उत्तर प्रदेशातील आठ मुली घर सोडून मुंबईत दाखल झाल्या होत्या. संस्थेला याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने या मुलींचा शोध घेतला. त्यानंतर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या मुलींना पुन्हा घरी पाठवले आहे.