नवी मुंबई : नागरिकांनी पकडलेले चोर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. हा प्रकार महिनाभरापूर्वी घडला होता. ठाणे अंमलदार एम. एन. नरसट, जे. जे. शिवशिंदे व एस. के. घोडके यांचा त्यात समावेश आहे. चोरीच्या प्रयत्नात असलेल्यांना नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्यात नेले होते. सकाळी चौकशीसाठी काही नागरिक पोलीस ठाण्यात गेले असता त्यासंबंधीचा गुन्हाच दाखल झालेला नसून चोरही पळाल्याचा प्रकार उघड झाला. मात्र चोर पळाल्याची माहिती वरिष्ठांना न देताच रात्रपाळीवरील पोलीस कर्मचारी घरी निघून गेले होते. त्यामुळे यासंबंधीची तक्रार नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. तसा अहवाल बनवून वरिष्ठांकडे तो सादर केला. त्यानुसार तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चोर पळाल्यामुळे तीन पोलीस निलंबित
By admin | Updated: April 2, 2015 00:27 IST