Join us

भांडुप येथे विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 05:47 IST

शनिवारी रात्री पूर्व उपनगरात पाऊस कोसळत असतानाच भांडुप येथील खिंडीपाडा रोडवर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मुंबई : शनिवारी रात्री पूर्व उपनगरात पाऊस कोसळत असतानाच भांडुप येथील खिंडीपाडा रोडवर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अनिल यादव (३२), सारा युनुस शेख (९) अशी मृतांची नावे आहेत. दुर्घटनेनंतर दोघांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.भांडुप येथेच शॉक लागून झालेल्या आणखी एका दुर्घटनेत ओम फडतरे (१०) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, रोहन सुतार हा जखमी झाला असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :मुंबई