Join us

आणखी तीन साक्ष, उलट तपासण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:06 IST

पनवेल :अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण शेवटच्या टप्प्यात आले असून या प्रकरणातील आणखी साक्ष व उलट तपासण्या शुक्रवारी पूर्ण झाल्या ...

पनवेल :अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण शेवटच्या टप्प्यात आले असून या प्रकरणातील आणखी साक्ष व उलट तपासण्या शुक्रवारी पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक सरोजना भगवानराव मोकलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरु किसन जाधव आणि एपीआय विनोद पाटील या तिघांच्या साक्ष व उलट तपासणी पूर्ण झाल्या.

अभय कुरुंदकर हा स्वत: नियंत्रण कक्षात येऊन आपणास रात्रगस्त रवानगीबाबत आणि रात्रगस्तीवरून परत आल्याबाबत नोंद घेण्यास कळविले नसल्याचे पोलीस निरीक्षक सरोज मोकलीकर यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे कुरुंदकरने १२ एप्रिल २०१६ रोजी याने रात्रगस्त केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव त्यावेळी नयानगर पोलीस स्टेशनला म्हणजे अश्विनी बिद्रे हत्या झाली त्यादिवशी नाईट राऊंडला होतो. या रात्री अभय कुरुंदकर किवा अन्य अधिकारी नाईट राऊंडला आमच्या हद्दीत आले नसल्याचे सांगितले. तर एपीआय विनोद पाटील यांनी मी अश्विनी बिंद्रेबरोबर काम करत होतो. '@मी सिकात जात आहे' असा व्हाॅट‌्सॲप ग्रुपवर मेसेज केला होता. पण लेखी अथवा स्वत: फोन करून अगर प्रत्यक्ष कार्यालयात येऊन कळविले नसून त्या एसएमएसची दिनांक होती १४ एप्रिल २०१६ म्हणजे अश्विनी बिंद्रेची हत्या झालेल्या तीन दिवसानंतर असल्याचे पाटील यांनी सांगितले. वरील तिघांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली असून पुढील सुनावणी गुरुवार १५ एप्रिलला आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि सर्व आरोपी सुनावणीस हजर होते.