Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीस लाखांचे हेरॉईन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:21 IST

अंधेरी परिसरातून तीस लाखांचे हेरॉईन अंबोली पोलिसांना शनिवारी जप्त केले.

मुंबई : अंधेरी परिसरातून तीस लाखांचे हेरॉईन अंबोली पोलिसांना शनिवारी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद लतीफ मोहम्मद नसीर कुरेशी (२५, रा. मूळ दमण) याला अटक केली.अंधेरीत सिटी मॉलजवळ काही जण अमलीपदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाला शुक्रवारी रात्री मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून कुरेशीला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्या पिशवीत त्याचे आधार कार्ड, तीस लाखांचे एक किलो हेरॉईन, साडेनऊ हजारांची रोकड सापडली.