Join us

कार धडकेत तिघे जखमी

By admin | Updated: November 16, 2014 01:50 IST

अंधेरी पूव्रेकडील नगरदास रोडवर पोलो कारच्या धडकेत पाच तरुण जखमी झाले. संध्याकाळी 4च्या सुमारास हा अपघात घडला. तिघांना उडविण्याआधी या कारने तीनचाकी टेम्पो व मारुती कारलाही धडक दिली.

मुंबई : अंधेरी पूव्रेकडील नगरदास रोडवर पोलो कारच्या धडकेत पाच तरुण जखमी झाले. संध्याकाळी 4च्या सुमारास हा अपघात घडला. तिघांना उडविण्याआधी या कारने तीनचाकी  टेम्पो व मारुती कारलाही धडक दिली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी विजय वेलजीभाई संधा या 2क्वर्षीय चालकाला निष्काळजीपणो वाहन चालवून पादचा:यांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अटक केली. 
या अपघातात विरारला राहणारे महेश वैद्य (48) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रतीक्षा नामदेव लाडे (19) आणि सुशांत देसाई (18) हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांना प्रथमोपचार देऊन सोडले. विजय अपघात झाला तेव्हा दारूच्या नशेत गाडी चालवत होता का हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय चाचणी केली. चाचणीचे अहवाल अपेक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. विजय अंधेरीचाच रहिवासी आहे. ज्या गाडीने हा अपघात घडला ती विजयच्या मालकाची होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.  (प्रतिनिधी)