मुंबई : आंबोली परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अहमद कुरेशी (वय ३५), सचिन भिलारे (२९) व राजू पवार (४०) अशी त्यांची नावे आहेत.आंबोली पोलीस नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना, सिटी मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ कुरेशीची तपासणी केली असता, पॉइंट बावीस एमएमची एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली. त्याचप्रमाणे, शुक्रवारी रात्री काही लोक शस्त्रास्त्र घेऊन अंधेरी पश्चिमच्या वीरा देसाई रोड येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचला आणि भिलारे, तसेच पवार या दोघांना अटक केली. दोघे चेंबुरचे रहिवाशी असून शस्त्रे कोणाकडून आणि कशासाठी आणली होती, याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
अांबोलीत शस्त्रास्त्रासह तिघांना अटक
By admin | Updated: June 19, 2016 02:56 IST