Join us
Daily Top 2Weekly Top 5

नारळ उत्पादकांच्या अनुदानात तिप्पट वाढ

By admin | Updated: June 23, 2014 03:04 IST

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत कोचीन येथे कार्यरत असलेले नारळ विकास मंडळ नारळ बागायतदारांना नारळ लागवड प्रक्षेत्र वाढविण्यासाठी १९८१ पासून आठ हजार रु पये प्रति हेक्टर जे अनुदान देत

अलिबाग : भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत कोचीन येथे कार्यरत असलेले नारळ विकास मंडळ नारळ बागायतदारांना नारळ लागवड प्रक्षेत्र वाढविण्यासाठी १९८१ पासून आठ हजार रु पये प्रति हेक्टर जे अनुदान देत होते ते वाढविण्यात यावे अशी मागणी नारळ विकास मंडळाच्या बैठकीत सदस्यांनी केली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्व विचार करून नारळ विकास मंडळाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात नारळ प्रक्षेत्र वाढविण्यासाठी अनुदानात तिपटीने वाढ केली आहे. आता नारळ बागायतदारांना टॉल जातींच्या नारळाची लागवड करायची झाल्यास प्रति हेक्टरी २६ हजार रु पये, हायब्रीड जातीसाठी प्रति २७ हजार रुपये व डवॉर्फ जातीची लागवड करायची झाल्यास प्रति हेक्टरी ३० हजार रु पये अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या अनुदानाचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा, असे आवाहन नारळ विकास मंडळाचे माजी सदस्य व उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी केले आहे. नारळ लागवडीच्या प्रक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांनी या तीन जातीपैकी रोपे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक नर्सरीतून रोपे खरेदी करावीत तसेच दोन रोपांच्या मध्ये २२ ते २५ फूट अंतर ठेवलेच पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष दिलेच पाहिजे असेही लिमये यांनी सूचित केले आहे. (विशेष प्रतिनिधी)