Join us

भरतीच्या लाटेत समुद्रकिनारी तिघे बुडाले; एकाला वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:35 IST

कुलाब्यातील गीतानगर येथील नेव्हीनगरातील किनाºयावर दुपारी साडेतीनच्या सुमारास साहिल शेख हा खेळताना पाण्यात वेढला गेला

मुंबई : पावसाची रिपरिप सुरू असताना भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर मजा-मस्ती करण्याची हौस शनिवारी तिघांच्या जिवावर बेतली. चौदा वर्षांचा एक विद्यार्थी कुलाब्यातील गीतानगरातील किनाºयाजवळ तर मरिन लाइन्सच्या किनाºयावर दोघे बुडाले. सुदैवाने एकाला सुखरूप वाचविण्यात यश आले.

साहिल झाकीर हुसेन शेख (१४) असे त्याचे नाव असून दोघे बेपत्ता आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. नौदलाच्या मदतीने पोलिसांकडूनही शोधमोहीम राबविण्यात आली.

कुलाब्यातील गीतानगर येथील नेव्हीनगरातील किनाºयावर दुपारी साडेतीनच्या सुमारास साहिल शेख हा खेळताना पाण्यात वेढला गेला. भरतीमुळे पाणी वाढू लागल्याने तो बुडू लागला. त्याच्या आरडाओरड्याने इतरांचे त्याकडे लक्ष गेले. जीवरक्षक व इतरांनी तेथे धाव घेतली. चपळाईने त्याच्यापर्यंत पोहोचत त्याला किनाºयावर आणले. त्वरित प्रथमोपचार केल्याने त्याचा जीव वाचला.

दुसरी घटना मरिन लाइन्सच्या किनारपट्टीवर घडली. दुपारी सव्वादोनच्या सुमारास दोघे तरुण खेळताना पाण्यात बुडाले. जीवरक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत लाटांच्या प्रवाहामुळे ते समुद्रात खोलवर बुडाले.रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाहीत. त्यांचे नाव अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.