Join us

धबधब्यात बुडून गोरेगावमधील तिघांचा मृत्यू

By admin | Updated: October 19, 2015 03:07 IST

वसईतील प्रसिद्ध मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ असलेल्या चिंचोटी धबधब्यात गोरेगाव (मुंबई) येथे राहणाऱ्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

पारोळ : वसईतील प्रसिद्ध मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ असलेल्या चिंचोटी धबधब्यात गोरेगाव (मुंबई) येथे राहणाऱ्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. रवी चौरसिया (१८), रिजवान खान (१८), अब्दुल साबीर (१९) अशी त्यांची नावे असून, ते गोरेगाव येथून सात मित्रांसह रविवारी सकाळी येथे पोहण्यासाठी आले होते. धबधब्यातील कुंडात पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांचा मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती वालीव पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन वसई-विरार अग्निशामक दलाच्या मदतीने तीन मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. (वार्ताहर)