Join us

तीन दिवसांत सात सोनसाखळी चोरीच्या घटना

By admin | Updated: June 9, 2014 02:16 IST

पश्चिम उपनगरांत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असून, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, दिंडोशी, कांदिवली आणि गोरेगाव येथे सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला आहे.

मुंबई : पश्चिम उपनगरांत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असून, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, दिंडोशी, कांदिवली आणि गोरेगाव येथे सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या तीन दिवसांत येथून एकूण सात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.रविवारी सकाळी ७.१५च्या सुमारास सुनीता दिनेश मेहरोत्रा (५५) या मुलीसोबत वांद्रे पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. त्यांच्या मागाहून आलेल्या दोन अज्ञात सोनसाखळी चोरांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रातील पेंडल आणि मोबाइल हिसकावून पळ काढला. वाकोला चर्च सांताक्रूझ येथून सकाळी १०च्या सुमारास पायी जात असलेल्या अंजलीन मॅन्युअल फर्नांडिस (५५) या महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरल्याची घटना घडली. विलेपार्ले पोलीस ठाण्यातही ८५ गॅ्रम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची नोंद केली आहे. योगिता असानिया (३८) या मैत्रिणीसोबत विलेपार्ले पूर्व येथून पायी जात होत्या. त्या वेळी दोन अज्ञात बाईकस्वारांनी दोघींच्याही सोनसाखळी चोरून पळ काढला.गोरेगाव येथे घरी जात असलेल्या रेणुका अशोक खंडेलवाल यांच्या गळ्यातील ३० गॅ्रम वजनाचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले, तर सकाळी ८.१५च्या सुमारास सुनीता सिंग या महिलेचे १८ गॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले राजेश नवनीत सोने (३२) यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरली. (प्रतिनिधी)