मुंबई : एकाच फ्लॅटसाठी अनेकांकडून लाखो रुपये टोकन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी, राम किशोर रावत (३५) याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने अशाच प्रकारे अजून तिघांना फसवल्याचे बुधवारी पोलीस तपासात उघड झाले आहे. कृष्णा पुजारी, चिराग शहा आणि रोहन इंटरप्रायझेस अशी रावतने फसवणूक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना टिष्ट्वन टॉवरमधील फ्लॅट विकण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले त्यानंतर, त्यांना तो टाळू लागला, असे पोलिसांचे सांगितले. कविता सिंघनिया यामहिलेला त्याने हाच फ्लॅट दाखवला आणि एक लाख रुपये त्यांच्याकडून टोकन घेतले. मात्र, त्यांनाही एनओसी देण्यास तो टाळाटाळ करू लागला. संशयामुळे सिंघनिया यांनी चौकशी केली. तेव्हा चार अन्य लोकांनाही त्याने अशाच प्रकारे फ्लॅट विकण्याचे सांगत, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे त्यांना समजले. (प्रतिनिधी)
फ्लॅट विक्रीच्या नावाखाली तिघांची फसवणूक
By admin | Updated: April 28, 2017 00:55 IST