Join us  

'त्या' तीन नगरसेवकांचं पद अखेर रद्द; सभागृहात महापौरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:49 PM

नगरसेवकांची याचिका जात पडताळणी समितीने अवैध ठरवत फेटाळली

- मनोहर कुंभेजकरमुंबई: मुंबई महानगर पालिकेतील भाजपा व काँग्रेस नगरसेवकांची याचिका जात पडताळणी समितीने अवैध ठरवत फेटाळली होती. या प्रकरणी नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाकडूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली. दरम्यान आज झालेल्या पालिका सभागृहात भाजपाच्या 2 काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द केल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला या तीन नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावर आता येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता,  भाजप नगरसेवक केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव यांच्या याचिका दि. 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या.

पालिकेत निवडून आल्यावर एका वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र हे प्रमाणपत्र सादर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती.  भाजपाचे नगरसेवक केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार होती. तर उच्च न्यायालयानेही तिघां नगरसेवकांच्या विरोधात निकाल दिल्यामुळे केशरबेन पटेल  प्रभाग क्रमांक 76, मुरजी पटेल प्रभाग क्रमांक 81 व राजपती यादव प्रभाग क्रमांक 28 यांचे नगरसेवक पद रद्द केल्याची घोषणा आज महापौरांनी  सभागृहात केली. लोकमतने गेली 9 महिने हा विषय सातत्याने मांडला होता.

दरम्यान, भाजपच्या प्रभाग क्रमांक 67 च्या नगरसेविका सुधा सिंग यांचे नगरसेवकपद उच्च न्यायालयाने कायम ठेवले असून प्रभाग क्रमांक 90 च्या काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलीप मिरांडा यांचा जातीचा दाखला पुन्हा जात पडताळणी समितीकडे पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. 

आता यांना मिळणार संधी केशरबेन मुरजी पटेल यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार नितिन बंडोपंत सलाग्रेमुरजी पटेल यांच्याऐवजी शिवसेनेचे उमेदवार संदीप नाईक राजपती यादव (काँग्रेस) ऐवजी शिवसेनेचे शंकर हुंडारे यांना नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका