Join us

पोलिसाला मारणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: May 4, 2015 23:57 IST

शहरातील वेताळपाडा, चव्हाण कॉलनीमधील घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात जाब विचारण्यास गेलेल्या महिलांना शांत करणाऱ्या महिला पोलिसाला मारहाण

भिवंडी : शहरातील वेताळपाडा, चव्हाण कॉलनीमधील घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात जाब विचारण्यास गेलेल्या महिलांना शांत करणाऱ्या महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या तीन महिलांना अटक केली.चव्हाण कॉलनीतील घटनेप्रकरणी शनिवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असताना यास्मिन सईद शेख, जुबैदा करीमअली अन्सारी, समीना मुर्तजा खान या तिघींनी पोलीस ठाण्यात आरडाओरड करून पो.उ.नि. सोनावणे यांना नवऱ्यांविरोधात तक्रार दाखल का करता, असा जाब विचारला. हा गोंधळ शांत करण्यासाठी महिला पोलीस माया डोंगरे यांनी शांत राहण्यास सांगितले. मात्र, त्या महिलांनी शिवीगाळ करीत डोंगरे यांच्या कानफटात मारली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार कॉ. डोंगरे यांनी दाखल करून यास्मिन, जुबैदा व समीना या तिघींना अटक केली.